जगदलपुर (छत्तीसगड) : आज मंगळवार (दि. 7 फेब्रुवारी) स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी जगदलपूर येथील लालबाग मैदानावर धार्मिक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. शंकराचार्य म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाच्या बाजूने नाहीत. ज्या दिवशी ते गोरक्षकांना गुंड म्हणणे बंद करतील, त्या दिवशी मी त्यांना हिंदुत्ववादी समजेन असे म्हणत स्वामी यांनी अनेक खळबळजनक विधाने केली आहेत.
भागवत यांच्याकडे विज्ञानाचे काही ज्ञान नाही : स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, नक्षलवाद्यांना केवळ राजकीय पक्षच पोसतात. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही नक्षलवादापासून हात मागे व्हा. मी नक्षलवाद संपवणार आहे. तसेच, शीख म्हणतात की, आमच्याकडे धर्मग्रंथ आहे. ज्यामध्ये कुठेतरी रामाचे नावर आहे. काही बायबलचे अनुसरण करतात तर काही कुराणचे अनुसरण करतात. सर्वांकडे आपले म्हणण्यासारखे काहीतरी आहे. मात्र, आरएसएसकडे असे ठोस काही ग्रंथ नाही. तसेच, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे विज्ञानाचे काही ज्ञान नाही त्यामुळे ते काहीही बोलत असतात असे खळबळजनक विधान स्वामी यांनी केली आहे.
योगींची स्तुती :उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे माझे सर्वात प्रिय आहेत. त्यांच्यात शिस्त आहे. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत. त्यांच्यात राजकारण करण्याची आणि राज्य करण्याची क्षमता आहे. ते मुख्यमंत्री नसताना मी गोरखपूरला जायचो तेव्हा ते मला भेटायला यायचे अशा शब्दांत योगी यांची स्तुती करताना स्वामी यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक केले आहे. स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले की, हे दोन्ही मुख्यमंत्री खाणारे नाहीत. खाण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे ते सर्व सद्गुणांनी परिपूर्ण आहेत. हिंदूंवर अन्याय करू देत नाहीत आणि होऊ देत नाहीत असही ते म्हणाले आहेत.