महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

75 Years of Independence : चळवळींना वरदहस्त देणारे राजर्षी शाहू महाराज; वाचा सविस्तर...

शाहू महाराजांना ( Chhatrapati Shahu Maharaj ) आरक्षणाचे जनक ( Father of Reservation ) असेही संबोधले जाते. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी कोल्हापूर संस्थानात ( Kolhapur Institute ) अनेक सामाजिक सुधारणा ( Civilization ) छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणल्या. याशिवाय स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज

By

Published : Jan 8, 2022, 6:05 AM IST

कोल्हापूर -छत्रपती शाहू महाराजांनी ( Chhatrapati Shahu Maharaj ) स्वातंत्र्यपूर्व कालखंडात राबविलेल्या सामाजिक सुधारणांची छाप राज्यघटनेत बघायला मिळते. त्यामुळेच त्यांना आरक्षणाचे जनक ( Father of Reservation ) असेही संबोधले जाते. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी कोल्हापूर संस्थानात ( Kolhapur Institute ) अनेक सामाजिक सुधारणा ( Civilization ) छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणल्या. याशिवाय स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील राजर्षी शाहू महाराज
  • महाराजांचा कोल्हापूर दौरा

शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापुरातील कसबा बावडा इथे घाटगे घराण्यात झाला. यानंतर 1922 पर्यंत 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. यादरम्यान त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. गादीवर येण्यापूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापूरचा दौरा करत राज्याची परिस्थिती समजून घेतली. यात त्यांना वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा प्रचंड पगडा जनतेवर दिसून आला. तसेच दारिद्र्यही त्यांना दिसून आले. यामागे अज्ञान हे कारण असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बहुजनांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : शहाजहांची मुलगी जहांआराने वसवलाय 'हा' चौक, वाचा सविस्तर...

  • नोकरी आणि शिक्षणात आरक्षण

शिक्षणावर भर देताना शिक्षण मोफतच नव्हे तर सक्तीचे करणारा कायदा त्यांनी केला. 26 जुलै 1902 रोजी त्यांनी राखीव जागांचा कायदा केला. यानुसार मराठा, कुणबी, दलित समाजातील नागरिकांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले. जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हा देश जेवढा हिंदूंचा आहे तेवढाच तो मुस्लिमांचाही आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

  • राधानगरी धरणाची पायाभरणी

कोल्हापुरात हरितक्रांती घडविणाऱ्या राधानगरी धरणाची पायाभरणी करण्याचे काम त्यांनी केले. स्वातंत्र्य लढ्यातही शाहू महाराजांनी महत्वाचे योगदान दिले आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या संघटनेला शाहू महाराज दरवर्षी 500 रुपये मदत करत होते. संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करून स्वातंत्र्य सैनिकांवर कारवाई होणार नाही याची काळजी ते घेत असत. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांनाही शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली आहे. अशा पद्धतीने सामाजिक सुधारणा घडवितानाच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही शाहू महाराजांनी मोठे योगदान दिले आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'या' क्रांतिकारकाच्या पिस्तूलचे नाव होते 'बमतुल बुखारा', वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details