महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Aryan drug case: एनसीबी मोतिहारी कारागृहात बंद असलेल्या मुंबईच्या 2 तस्करांची घेणार रिमांड - aryan khans drug case

एनसीबीचा मुंबई क्रुझ पार्टी प्रकरणाच्या तपासाचा अवाका आता वाढला आहे. आर्यन खानसोबत ज्या 8 व्यक्तींना अटक झाली होती त्यातील एक व्यक्ती ही बिहारच्या मोतिहारी जेलमध्ये गजाआड असणारा मुंबईच्या मलाड येथील रहिवासी ड्रग तस्कर विजय वंशी प्रसाद याची नातेवाईक आहे. एनसीबी विजय वंशी प्रसाद आणि उस्मान शेख याला प्रोडक्शन रिमांडवर मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीला लागली आहे.

Aryan Khan Drugs Case
आर्यन खान ड्रग्स केस

By

Published : Oct 18, 2021, 5:19 PM IST

Updated : Oct 18, 2021, 5:35 PM IST

पटना (बिहार) -एनसीबीचामुंबई क्रुझ पार्टी प्रकरणाच्या तपासाचा अवाका आता वाढला आहे. आर्यन खानसोबत ज्या 8 व्यक्तींना अटक झाली होती त्यातील एक व्यक्ती ही बिहारच्या मोतिहारी जेलमध्ये गजाआड असणारा मुंबईच्या मलाड येथील रहिवासी ड्रग तस्कर विजय वंशी प्रसाद याची नातेवाईक आहे. एनसीबी विजय वंशी प्रसाद आणि उस्मान शेख याला प्रोडक्शन रिमांडवर मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत महाराष्ट्र पोलीस त्यांची चौकशी करणार आहे.

हेही वाचा -रेल रोको आंदोलन : रेलवे ट्रैक पर बैठे प्रदर्शनकारी किसान, ट्रेनों की आवाजाही ठप

..अशी झाली होती विजय वंशी प्रसादला अटक

चौकशीसाठी चार दिवसांपूर्वीच न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. चौकशीत विजय वंशी प्रसादच्या ड्रग सप्लाईच्या नेपाल नेटवर्कबाबतही एनसीबीला माहिती मिळाली होती. 19 सप्टेंबरला मुजफ्फरपूरमध्ये नेपालच्या 3 ड्रग पुरवठादारांसह एकूण 6 लोकांना अटक झाली होती. सोबतच 1 किलो चरस आणि 13 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले होते. या पुरवठादारांच्या सांगण्यावरूनच पूर्व चंपारणच्या चकिया टोल प्लाजा जवळून मुंबईचा तस्कर विजय वंशी प्रसाद, उस्मान शेखसह 7 व्यक्तींना अटक झाली होती.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींनी केले महत्वाचे खुलासे

आर्यन खानसह ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींनी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. ड्रग पुरवठ्याचे जाळे आता नेपाळ आणि उत्तर बिहारमधील मुजफ्फरपूरच्या अनेक तस्करांशी जुळत आहेत. सुत्रांकडून मिळाेल्या माहितीनुसार, सेंट्रल जेलमध्ये कैद नेपाळचे तीन आणि मुजफ्फरपूर कटरा पहसौलच्या तीन तस्करांची माहिती देखील पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

..अशी व्हायची ड्रगची तस्करी

महाराष्ट्रातील मलाड वेस्ट येथील दीपक यादव उर्फ टार्झन उर्फ बाबा या सिंडिकेटचा सुत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. दीपकसाठीच उस्मान, विजय, नेपाळ येथील प्रकाश, सात्विक, संजय आणि मुजफ्फरपूरच्या कटरा पहसौलचा गौरव कुमार, बांसो कुमार आणि रुपेश शर्मा काम करत होते. हे सर्व कारने नेपाळहून रस्तामार्गे महाराष्ट्रात ड्रगची तस्करी करत असे.

मुंबई एनसीबी किंवा पोलिसांनी या प्रकरणी संपर्क केलेला नाही - एसपी

मोतिहारी मध्यवर्ती करागृहात बंद असलेल्या दोन्ही ड्रग तस्करांविषयी माहिती घेण्यासाठी मुंबई एनसीबीमार्फत जिल्हा पोलिसांना संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलीस अधीक्षक नवीन चंद्र झा यांनी ही बाब फेटाळली आहे. ते म्हणाले की, कदाचित मुंबई एनसीबीचे पथक आले असेल, मात्र आपल्याशी मुंबई एनसीबी किंवा मुंबई पोलिसांनी या प्रकरणी संपर्क केलेला नाही. मोतिहारी मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक विधू कुमार यांनी देखील या प्रकरणी मुंबई एनसीबीच्या पथकाने आपल्याशी संपर्क केला नसल्याचे सांगितले आहे.

अमली पदार्थ देशासाठी समस्या

अमली पदार्थ देशासाठी मोठे संकट बनले आहे. आर्थिक गुन्हे युनिट जे अंमली पदार्थांसाठी नोडल एजन्सी देखील आहे, त्याचबरोबर एनसीबी आणि एसएसबीकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. तस्करीच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये अमली पदार्थ पोहोचवली जात आहेत. अनेक तस्करांना एनसीबी, एसएसबी आणि आर्थिक गुन्हे युनिटने अटकही केली. तस्कर बिहार आणि झारखंडचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी मार्ग म्हणून वापर करत राहिले आहेत. काही लोकांनी अमली पदार्थांच्या तस्करीला जगण्याचे साधन बनवले आहे.

एनसीबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2020 मध्ये एनसीबीद्वारे 6 हजार 25 किलो गांजा, 2.45 किलो हेरॉइन, 3.90 किलो चरस आणि 51.40 किलो अफू जप्त करण्यात आला होता. या व्यतिरिक्त पूर्ण वर्षभरात 85 तस्करांना अटक करण्यात आली होती. तेच वर्ष 2021 मध्ये एनसीबीच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 30 लोकांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -रंजीत मर्डर केस : राम रहीम को आजीवन कारावास

Last Updated : Oct 18, 2021, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details