महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : शहीद-ए-आझम भगतसिंग! एक क्रांतिकारक ज्याने स्वातंत्र्यासाठी चालवली केवळ एक गोळी - लाला लजपतराय मृत्यू

शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी अपूर्ण आहे. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग (Bhagat Sing), सुखदेव (Sukhdev) आणि राजगुरू (Rajguru) यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. यावेळी भगतसिंगांचं वय होतं केवळ 23 वर्ष. त्यांना भारत सरकारने अद्यापही शहीदाचा दर्जा दिला नसला, तरी त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे ते जनमानसांमध्ये शहीद-ए-आझम (Shahid-e-Azam Bhagat Sing) झाले.

Shahid e Azam Bhagat Sing story
Shahid e Azam Bhagat Sing story

By

Published : Dec 5, 2021, 6:06 AM IST

Updated : Mar 23, 2022, 11:48 AM IST

पंजाब - शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी अपूर्ण आहे. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग (Bhagat Sing), सुखदेव (Sukhdev) आणि राजगुरू (Rajguru) यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. यावेळी भगतसिंगांचं वय होतं केवळ 23 वर्ष. त्यांना भारत सरकारने अद्यापही शहीदाचा दर्जा दिला नसला, तरी त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे ते जनमानसांमध्ये शहीद-ए-आझम (Shahid-e-Azam Bhagat Sing) झाले. देश विदेशातील युवकांना सतत प्रेरणा देणारे भगतसिंग क्रांतिकारी कसे बनले आणि त्यांची विचारधारा नेमकी काय होती, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

  • भगतसिंग यांच्या रक्तातच होती देशभक्ती-

ब्रिटीश राजवटीला हादरवून सोडणाऱ्या शहीद-ए-आझम भगतसिंग (Bhagat Sing Birthday) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लायलपूर (पाकिस्तान) येथे झाला. राजकीयदृष्ट्या सक्रिय कुटुंबात जन्मलेल्या भगतसिंग यांच्या रक्तातच देशभक्ती होती. त्यांचे आजोबा अर्जन सिंग (Arjan Sing) हिंदू सुधारणावादी चळवळीशी संबंधित होते. तर वडील किशन सिंग (Bhagat Sing Father Kishan Sing) आणि काका अजित सिंग (Bhagat Sing Uncle Ajit Sing) हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील गदर पक्षाचे (Ghadar Movement) सदस्य होते. भारतीय स्वातंत्र लढ्यात (National Independence Movement) सहभागी होण्यासाठी भगत सिंगांना 3 गोष्टींपासून प्रेरणा मिळाली होती. पहिला जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh Massacre), ज्यात हजारो नागरीक मारले केले गेले होते. दुसरं म्हणजे गदर चळवळीचे नेते कर्तारसिंह सराभा (Ghadar Movement Leader kartarsing sarabha) यांचा भगतसिंगांवर मोठा प्रभाव होता आणि तिसरं सर्वात मह्त्त्वाचे म्हणजे त्यांना श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळालेली होती.

शहीद-ए-आझम भगतसिंग
  • 'माणसाच्या शरीराला मारतां येतं पण विचार नाही' -

भगतसिंग यांना पुस्तकं वाचण्याची आवड होती. 1921 मध्ये आयर्लंडला डी व्हॅलेरा यांच्या आंदोलनानं डोमिनियन स्टेटस (Dominion Status) मिळालं. त्यासंदर्भातील पुस्तक MY FIGHT FOR IRISH FREEDOM by DAN BREEN हे प्रत्येकाला वाचता यावं, यासाठी भगत सिंग यांनी ते हिंदीत अनुवादीत केलं. त्यातून भगतसिंगांनाही खूप काही शिकायला मिळालं. भगतसिंग नेहमी म्हणायचे की माणसाच्या शरीराला मारतां येतं पण त्यांचे विचार नाही. माणसाचे विचार हे अमर असतात. त्यामुळेच त्यांनी 'इंक्लाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद', (Long live the revolution) ही घोषणा दिली. साम्राज्यवादाची व्याख्या करताना ते म्हणाले होते की. परकीय जोपर्यंत नागरिकांची लूट करतील तोपर्यंत त्यांचं जिवन सुखकर होणं शक्य नाही.

  • दोन घटनांनी बदललं भगतसिंगांचं आयुष्य -

भगतसिंग यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या घटना, ज्यांनी त्यांचे आयुष्य बदलून टाकलं होतं. एक म्हणजे साँडर्सची हत्या (Saunders Murders Case) आणि दुसरी घटना एसेंल्बी बॉम्बस्फोट. (Assembly Bomb Case) 1928 मध्ये सायमन कमिशन (Simon Commission In India) भारतातील घटनात्मक सुधारणांचा आढावा घेण्यासाठी भारतात आलं होतं. त्याला सर्वांचाच विरोध होता. त्यांचं कारण म्हणजे. या कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. याविरोधात भगतसिंग यांनी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन केले. यावेळी लाहोरमध्ये सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र, या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. या हल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू (Lala Lajpatrai Death) झाला. भारत नौजवान सभा आणि सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या तरुणांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवलं. त्यांनी लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या स्कॉटची हत्या (Scott) करण्याची योजना आखली. ऑफिस संपल्यानंतर स्कॉट घरी परतताना त्याला गोळ्या घालायच्या अशी योजना होती. पण सुदैवाने त्यादिवशी स्कॉट सुट्टीवर असल्यानं तो वाचला. त्याची मोटारसायकल हवालदार सॉंडर्स वापरत होता. त्यामुळे स्कॉट समजून सॉंडर्स हत्या झाली.

भगतसिंगांच्या आयुष्यातील दुसरी मोठी घटना म्हणजे ८ एप्रिल १९२९ रोजी सेंट्रल असेंब्लीमध्ये केलेला बॉम्बस्फोट. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचावा. यासाठी अनेक स्फोट घडवण्यात आले होते. त्याचप्रमाणे बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याची योजना आखली. दोघांनी सेंट्रल असेंब्लीच्या आतील रिकाम्या जागेवर दोन बॉम्ब फेकले आणि 'बहिऱ्या सरकारला ऐकण्यासाठी आवाज आवश्यक होता', अशी पत्रकेही फेकली. या बॉम्ब हल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हल्यामुळे इंग्रज सरकार संपूर्णपणे हादरले होते. बॉम्ब टाकल्यानंतर दोघेही पळून न जाता. तिथेच उभे राहिले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • साँडर्स हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा झाला -

या हल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे खटल्यादरम्यान दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, ब्रिटीशांचा हेतू भगतसिंगांना फाशी देण्याचा होता. म्हणूनच त्यांनी 7 ऑक्टोबर 1930 ला साँडर्स हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना साँडर्स हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली. ब्रिटीश इथेच थांबले नाहीत तर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना सगळ्यांसमोर फाशीही दिली.

यापूर्वी 31 मार्च ही फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. यावेळेस अनेक तरूण परीक्षांमध्ये व्यस्त असतील आणि शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असतीत, असा इंग्रजांचा समज होता. मात्र, भगतसिंग यांच्या फाशीला परिसरात मोठा विरोध झाला होता. हा विरोध पाहून इंग्रजांनी २४ मार्च रोजी तिघांनाही फासावर चढवण्याचा निर्णय घेतला. ही बातमी भगतसिंगांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आणि २३ तारखेला संध्याकाळी लाहोर तुरुंगाबाहेर मोठा जमाव जमला. सर्व प्रोटोकॉल मोडून 23 मार्चच्या संध्याकाळी तिघांनाही फाशी देण्यात (Bhagat Sing Hang) आली. तसंच त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याऐवजी तुरुंगाच्या मागच्या बाजूला नेत हुसेनीवाला येथे जाळून टाकण्यात आले आणि हे जळालेले मृतदेह सतलज नदीत फेकण्यात आले.

शहीद-ए-आझम भगतसिंग हे केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही लोकप्रिय आहेत. लाहोरमधील भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशनच्यावतीनं भगतसिंग यांना राष्ट्रीय शहीदाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अज्ञातवासातील महत्त्वपूर्ण बंगला 'गिड्डापहार'

Last Updated : Mar 23, 2022, 11:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details