महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

shahdol son carries mother dead body on bike मध्यप्रदेशातील भीषण वास्तव; आईचा मृतदेह मुलाला न्यावा लागला दुचाकीवरुन

मध्य प्रदेशातील आरोग्य सेवांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याची प्रचिती शहडोल जिल्ह्यात दिसून आली आहे (Ambulance Not found in Shahol). अँब्युलन्स म मिळाल्याने एका मुलाने आईचा मृतदेह दुचाकीवरून घरी नेला (Son carry mother dead body on Bike). त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्यप्रदेशातील भीषण वास्तव
मध्यप्रदेशातील भीषण वास्तव

By

Published : Aug 1, 2022, 3:32 PM IST

शहाडोल: मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मृतदेह नेण्यासाठी अँब्युलन्स मिळत नसल्याने एक तरुण आपल्या आईचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना दिसतो (Ambulance Not found in Shahol) . हा व्हिडिओ शहडोल मेडिकल कॉलेज जवळचा आहे. मृतांच्या नातेवाईकांकडे खासगी वाहन देण्यासाठी पैसे नव्हते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुलाला दुचाकीवरून मृतदेह घरी आणण्यास भाग पाडले. मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा पर्दाफाश यातून झाला आहे.

मध्यप्रदेशातील भीषण वास्तव

मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही गाडी: अनुपपूर जिल्ह्यातील गोदारू गावात राहणाऱ्या जयमंत्री यादव या महिलेच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना शहडोल जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे प्रकृती खालावल्याने रुग्णाला शहडोल वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घरी नेण्याची गाडीची मागणी करण्यात आली. मात्र मृतदेह नेण्यासाठी त्यांना गाडी मिळाली नाही.

खाजगी वाहनाचे मालग 5000 रुपये होते मागत: ज्यांच्याकडे खाजगी वाहन आहे ते मृतदेह घरी नेण्यासाठी 5000 रुपये मागत होते. मात्र खासगी वाहनासाठी एवढे पैसे कुटुंबाकडे नव्हते. म्हणून त्याच्या मुलाने 100 रुपयांची लाकडी फळी विकत घेतली. कसा तरी त्या फळीला आईचा मृतदेह बांधला आणि तो बाईकवर ठेवला. त्यानंतर तो शहडोल येथून अनुपपूर जिल्ह्यातील गोदारू गावाकडे निघून गेला (Son carry mother dead body on Bike). शहडोल जिल्हा मुख्यालयापासून हे अंतर अंदाजे 80 किलोमीटर आहे.

ढासळलेली आरोग्य व्यवस्था: दुचाकीवरून मृतदेह घेऊन जात असतानाचा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील खराब आरोग्य सुविधांचा पर्दाफाश करतो. रुग्णालयात रुग्णवाहिका व मृतदेहांच्या वाहतुकीची सुविधा नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मृतदेह घरी नेण्यासाठी विविध प्रयत्न करावे लागतात. मोठमोठे दावे करणारे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या राज्याची ही अवस्था आरोग्य व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण करत आहे (MP Poor Health System).

हेही वाचा - India records first death due to monkeypox: मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू

हेही वाचा - Frog in Upma Crow feather in meal: आंध्र प्रदेशातील दोन विद्यापीठांच्या वसतिगृहांमध्ये उपमामध्ये बेडूक, जेवणात कावळ्याचे पीस

ABOUT THE AUTHOR

...view details