नवी दिल्ली -शबनम हे नाव ऐकताच अंगावर शहारे येतात. त्याला कारणही तसेच आहे. प्रियकर सलीमसाठी शबनमने आपल्या कुटुंबातील 7 जणांची निर्घृण हत्या केली होती. तेव्हापासून शबनम जिल्हा कारागृहात बंद आहे. आता तीला लवकरच फाशी दिली जाणार आहे. फाशीची रद्द व्हावी, यासाठी शबनमने राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या दयेचा अर्ज केला होता. मात्र, त्यांनी दयेचा अर्ज फेटाळला असून शबनमला मथूरा तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. फाशी कधी होईल, याची तारीख अद्याप पक्की केली नाही. पण, फाशी घराची डागडुजी आणि नवीन दोरीची ऑर्डर देण्यात आली आहे.
मेरठच्या पवन जल्लादची प्रतिक्रिया कुऱ्हाडीचे वार करत कुटुंबीयांचीच हत्या -
अमरोहाच्या बाबनखेडी गावात राहणाऱ्या शबनमनेचे सलीम नावाच्या व्यक्तींवर प्रेम होते. शबनम गरोदर होती. मात्र, सलीमसोबत लग्न लावून देण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. तेव्हा 14 एप्रिल 2008 ला आपला प्रियकर सलीमसोबत मिळून शबनमने वडील शौकत अली, आई हाशमी, भाऊ अनीस अहमद, त्याची पत्नी अंजुम, पुतणी राबिया आणि भाऊ राशिद आणि अनीसच्या 10 महीन्यांच्या मुलाची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी तीने सर्वांना औषध देऊन बेशुद्ध केले. नंतर कुऱहाडीने वार करून हत्या केली. मात्र, हे प्रकरण समोर आले.
देशात पहिल्यांदाच एका महिलेला दिली जाणार फाशी... दोघांना फाशीची शिक्षा -
15 जुलै 2010 ला ट्रायल कोर्टाने दोघांना दोषी करार देत फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टानेही फाशीला कामय ठेवले होते. शबनमने मुलाचा हवाला देत माफीची मागणी केली होती. 2015 सप्टेंबर उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनीदेखील शबनमची दया याचिका फेटाळून लावली होती.
फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला -
मथुरा कारागृह प्रशासन शबनमच्या 'डेथ वॉरंट'च्या प्रतीक्षेत आहे. शबनम स्वतंत्र भारतातील फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला ठरू शकते. मात्र, फाशीची शिक्षा सुनावलेली पहिली महिला शबनम नाही. लहान मुलांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना 2001 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नव्हती. यातील एकीचा तुरुगांतच मृत्यू झाला होता. त्यामुळे गावित भगिनी या स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर सोनिया नामक महिलेची 2007 साली सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम केली होती. फाशीची शिक्षा मिळालेली शबनम ही तिसरी महिला आहे. तर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर शबनम फाशीची शिक्षा दिलेली महिला पहिला ठरू शकते.
महिलांसाठीचे एकमेव फाशीघर -
फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी देशात फक्त मथुरेच्या कारागृहातच महिलांना फाशी देण्याची सोय आहे. या कारागृहात 150 वर्षांपासून महिलांसाठी फाशीची शिक्षा द्यायची सोय करण्यात आली आहे. महिलांना फाशी देण्यासाठी मथुरा तुरुंगात 1870 मध्ये फाशी घर बनवण्यात आले होते. पण आतापर्यंत इथे एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत पडलेल्या या फाशी घराची डागडुजी करण्यात येत आहे. स्वतंत्र भारतात महिलेला फासावर चढवण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. मथुरा कारागृहात शबनमला फाशी देण्याची तयारी सुरू आहे.