अमरोहा (उत्तर प्रदेश) - बावनखेडी हत्या प्रकरणातील आरोपी शबनम हिची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायालयाने आरोपी शबनमचा तक्रारदारांकडून तपशील मागविला होता. यावर शबनमच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, राज्यपालांना पुन्हा दया याचिका पाठविली गेली आहे. यामुळे शबनमच्या फाशीची तारीख निश्चित झालेली नाही.
रामपूर कारागृह प्रशासनाने सांगितले आहे की, शबनमने उत्तर प्रदेशच्या राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे दुसर्यांदा दया याचिका पाठविली आहे. या दया याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे न्यायालयाने ही फाशी सध्या पुढे ढकलली आहे, असे सरकारी वकील महावीर सिंह यांनी सांगितले. यापूर्वी केलेली दया याचिका फेटाळली गेली होती, आता पुन्हा दया याचिका देण्यात आली असून राष्ट्रपतींद्वारे ती स्वीकारली जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.