बंगळुरू : सेक्स सीडीप्रकरणी चर्चेत आलेल्या कर्नाटकच्या जल संसाधन मंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मंगळवारी एक व्हिडिओ माध्यमांमध्ये समोर आला होता. या व्हिडिओमध्ये रमेश जारकीहोली हे एका महिलेसह आक्षेपार्ह परिस्थितीत दिसून येत आहेत. या महिलेला नोकरी देण्याच्या निमित्ताने रमेश यांनी या महिलेचे शोषण केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी केला होता.
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला राजीनामा..
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश यांनी आज (बुधवार) मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता. येदीयुरप्पा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. तसेच, या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी रमेश यांनी केली आहे.