हरिद्वार:उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना (uttarakhand corona case) पसरत आहे. त्याचवेळी हरिद्वार तुरुंगात 43 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हेपेटायटीसच्या तपासणीदरम्यान नमुने घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आता आला आहे (inmate corona positive in haridwar jail). त्यामध्ये कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. एकाचवेळी 43 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ कारागृह अधीक्षक मनोज आर्य यांनी सांगितले की, कारागृहात हिपॅटायटीसच्या तपासणीसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कैद्यांचे नमुने घेण्यात आले. यादरम्यान कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्हा कारागृहात सध्या 1250 हून अधिक पुरुष आणि 60 हून अधिक महिला कैदी आहेत.