महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Avalanche In Sikkim : सिक्कीममध्ये हिमस्खलनात 6 पर्यटकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता - सिक्कीम हिमस्खलन

सिक्कीममध्ये आज दुपारी हिमस्खलनाची मोठी घटना घडली आहे. या हिमस्खलनात शेकडो पर्यटक अडकले असून, आतापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Avalanche In Sikkim
सिक्कीममध्ये हिमस्खलन

By

Published : Apr 4, 2023, 5:39 PM IST

गंगटोक (सिक्कीम) : सिक्कीममध्ये हिमस्खलनात 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, किमान 11 जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनात 100 हून अधिक पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बर्फात गाडले गेल्याने अनेक पर्यटक बेपत्ता आहेत. या घटनेने सिक्कीममध्ये खळबळ उडाली आहे. सिक्कीम सरकारने घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.

शेकडो पर्यटक खड्ड्यात गाडले गेले : प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून 28 किमी अंतरावर असलेल्या पूर्व सिक्कीममधील संगामो तलावाजवळ आज दुपारी हिमस्खलन झाले. दुपारी 12.20 च्या सुमारास ही भीषण घटना घडली. दरड कोसळल्याने रस्त्यावरील पर्यटक खड्ड्यात गाडले गेल्याची माहिती आहे. पर्यटकांनी भरलेली अनेक वाहनेही खड्ड्यात अडकली आहेत. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :भारतीय लष्कर, सिक्कीम पोलीस, आपत्ती प्रतिसाद दल आणि विविध स्वयंसेवी संस्था सध्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना वाचवण्यात आले असून गंभीर जखमींना गंगटोक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्तीची तीव्रता लक्षात घेता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी किमान 150 लोक बर्फाच्या जाड थराखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग गोले यांनी गंगटोक रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबांची आणि जखमींची भेट घेतली.

लष्कराचे बचाव कार्य चालू : घटनेवर भारतीय लष्कराचे कर्नल अंजन कुमार बसुतारी म्हणाले, 'भारतीय लष्कराच्या पाच तुकड्या आधीच बचाव साहित्यासह घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. सध्या बचाव कार्य चालू आहे'. चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनझिंग भुतिया यांनी सांगितले की, नाथुला पासेस 13 मैलांपर्यंतच जारी केले जातात, परंतु पर्यटक परवानगीशिवाय 15 मैलांपर्यंत पोहोचले होते. 15 मैल अंतरावरच हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे, सिक्कीममध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून हिमस्खलनाचा कुठलाही मोठा प्रकार घडलेला नाही.

हेही वाचा :Bengal Violence accused Arrested: पश्चिम बंगालच्या हिंसाचार प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक, मित्राच्या घरी होता मुक्कामाला

ABOUT THE AUTHOR

...view details