तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये सात वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिसूर जिल्ह्यातील पल्लकड-त्रिसूर महामार्गावरील वाझुकमपारा गावाजवळील कुथिरन बोगद्याजवळ हा अपघात झाला. अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाने वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.
केरळ : सात वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू - केरळ त्रिसूर अपघात
केरळमध्ये सात वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिसूर जिल्ह्यातील पल्लकड-त्रिसूर महामार्गावरील वाझुकमपारा येथील कुथिरन बोगद्याजवळ हा अपघात झाला.
मालवाहू ट्रॅकमूळे अपघात -
मालवाहू ट्रॅक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅकने शेजारी वाहनांना धडक दिली. सात वाहनांना धडक दिल्याने काही गाड्या पलटीही झाल्या. दोन दुचाकींनाही ट्रॅकने धडकी दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा आणि कारमधील एका व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पलक्कड-त्रिसूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.