महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : यमुना महामार्गावर टँकर-कारचा भीषण अपघात, सात प्रवासी जागीच ठार - उत्तर प्रदेश यमुना महामार्ग अपघात

मंगळवारी रात्री उशीरा महामार्गावर एक टँकर अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या इनोव्हा कारला धडकला. यामध्ये इनोव्हा कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला.

टँकर पलटल्याने भीषण अपघात
टँकर पलटल्याने भीषण अपघात

By

Published : Feb 24, 2021, 6:55 AM IST

Updated : Feb 24, 2021, 9:55 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात टँकर आणि इनोव्हा कारमधील भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काल (मंगळवार) रात्री उशीरा जिल्ह्यातील नोहझील पोलीस ठाणे क्षेत्रातून जाणाऱ्या यमुना महामार्गावर हा अपघात झाला. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. इनोव्हा कारमधून एक कुटुंब आग्र्यावरुन नोयडाकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

टँकर पलटल्याने भीषण अपघात

अनियंत्रित टँकरने कारमधील सात जणांचा गेला जीव -

मंगळवारी रात्री उशीरा महामार्गावर एक टँकर अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळला. त्यानंतर रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या इनोव्हा कारवर जाऊन धडकला. यामध्ये इनोव्हा कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला. हा टँकर ऑईलची वाहतूक करणारा असल्याने महामार्गावर तेलही मोठ्या प्रमाणात सांडले. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक रोखून धरली. अश्निशमन दलाला बोलावून टँकरवर पाणी मारण्यात आले. तसेच बचावकार्य हाती घेतले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने सातही जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

यमुना महामार्गावर टँकर-कारचा भीषण अपघात

अपघातात संपूर्ण कुटुंबाचा चालकासह मृत्यू झाला. पती, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. सर्वजण हरयाणातील असून दिल्लीच्या दिशेने चालले होते. वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. गौरव ग्रोव्हर यांनी घटनेची माहिती दिली.

Last Updated : Feb 24, 2021, 9:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details