महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकमध्ये दोन मोठे अपघात; सात जणांचा मृत्यू - कर्नाटक अपघात बातमी

बागलकोटच्या हुंगुंडमध्ये झालेल्या अपघातात चंद्रु बुट्टा, नवीन साका, करीबासय्या आणि आणखी एकाचा मृत्यू झाला. या सर्वांसह गाडीमध्ये चालकदेखील होता, ज्याची स्थिती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.

Seven killed in two separate accidents in Karnataka
कर्नाटकमध्ये दोन मोठे अपघात; सात जणांचा मृत्यू

By

Published : Mar 29, 2021, 5:32 PM IST

बंगळुरू : कर्नाटकात आज (सोमवार) दोन विविध अपघातांमध्ये सात जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बागलकोट जिल्ह्यात झालेल्या एका 'हिट अँड रन' प्रकरणात चौघांचा मृत्यू झाला; तर कोप्पल जिल्ह्यात ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात तिघांना आपले प्राण गमवावे लागले.

'हिट अँड रन'मध्ये चौघांचा मृत्यू; चालक गंभीर..

बागलकोटच्या हुंगुंडमध्ये झालेल्या अपघातात चंद्रु बुट्टा, नवीन साका, करीबासय्या आणि आणखी एकाचा मृत्यू झाला. या सर्वांसह गाडीमध्ये चालकदेखील होता, ज्याची स्थिती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.

तर, कोप्पलमध्ये ट्रक आणि रिक्षात झालेल्या अपघातात फकिराप्पा नागप्पा होलेयाचे, भिमण्णा चिन्नाप्पा ह्याती आणि रामण्णा शंकराप्पा डोल्ली या तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :आंध्र प्रदेशमध्ये दोन बसेसची टक्कर, अपघातात चार ठार; मोठा अनर्थ टळला

ABOUT THE AUTHOR

...view details