गुवाहाटी -असामच्या दिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग-37 वर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि कारची धडक झाल्याने अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषीत केले. वेगाने येत असलेल्या कारवरील नियत्रंण चालकाने गमवल्यामुळे अपघात झाला.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात -
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पनवेल जवळ एसटी बसला मध्यरात्री अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मुंबई बेस्ट चालक हे एसटीने प्रवास करीत होते. त्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर 16 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासी हे झोपेत असल्याने अपघात झाल्याचे काही क्षण त्यांना कळलेच नाही.
हेही वाचा -मजुरांना घेऊन जाणारे वाहन ट्रॅक्टरला धडकले, अपघातात एकाचा मृत्यू तर सात जखमी