बंगळुरू - बंगळुरू शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची (Shivaji statue desecration Case) घटना शुक्रवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर कर्नाटक-महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली होती. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या संशयित आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिसांनी याप्रकरणी सात संशियतांना अटक केली आहे. सर्व संशयित रनधीर सेनेशी (Karnataka Ranadhira Force) संबंधित आहेत. अटक केलेल्यांमध्ये रणधीर सेनेचा अध्यक्ष चेतन गौडा याचा समावेश आहे. बंगळुरूतील सनकी टँक रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Shivaji statue desecration Case) करण्यात आली होती.
अटक केलेल्यांमध्ये चेतन कुमार, माजी आमदार टी. नारायण कुमार यांचा मुलगा व राष्ट्रीय अखिल कर्नाटक कन्नड आंदोलन समितीचा अध्यक्ष गुरुदेव नारायण कुमार यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वरूण, नवीन गौडा, विनोद, चेतन कुमार व योगेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.