महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर गोव्यात रात्री ११ नंतर मद्यबंदी, आजपासून निर्णय लागू - undefined

goa
goa

By

Published : Feb 3, 2022, 6:06 PM IST

Updated : Feb 3, 2022, 6:44 PM IST

18:03 February 03

उत्तर गोव्यात रात्री 11 नंतर मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.

पणजी (गोवा) - लिकर बार, पब्ज, शॉप्स, क्लब, शॅक्स आणि इतर ठिकाणी रात्री ११ नंतर मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू असण्यापर्यंत या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार.

गोवा विधानसभा निवडणुकीकडे ( Goa Assembly Elections 2022 ) सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. गोव्याची राजधानी पणजी ही राजकीय अस्थिरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी केवळ काँग्रेसआणि भाजपच नाही, तर ममता बॅनर्जींची टीएमसी आणि अरविंद केजरीवाल यांची 'आम आदमी पार्टी'ही आपला दबदबा आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India ) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला निवडणूक होईल. तर १० मार्चला निकाल लागणार आहे.

2017 विधानसभा निवडणूक -

2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly Elections 2017 ) 40 पैकी 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, लुईझींनो फलेरो आणि दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या अंतर्गत वादात भाजपाने आपल्या 13 आमदारसह महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 आमदार, गोवा फॉरवर्ड 3 आमदार व 2 अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली.

2017 सालीचे पक्षीय बलाबल -

भाजपा 13 आमदार
काँग्रेस 17 आमदार
गोवा फॉरवर्ड 3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस 1 आमदार
अपक्ष 3 आमदार

2019 ला राजकीय परिस्थिती बदलली -

2019 ला ( गोवा विधानसभा निवडणूक 2019 ) भाजपचे तत्कालीन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा व त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे निधन झाले. त्यातच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर या दोन काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला होता, म्हणून विधानसभेतील पक्षिय बलाबल होते.

भाजपा 12 आमदार
काँग्रेस 14 आमदार
गोवा फॉरवर्ड 3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस 1 आमदार
अपक्ष 3 आमदार


Last Updated : Feb 3, 2022, 6:44 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details