पुणे-सीरमने लस उत्पादनात शुक्रवारी नवा मैलाचा दगड गाठला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (सीरम) पुण्यातील उत्पादन प्रकल्पामधून कोरोना लस कोवोवॅक्सचे उत्पादन शुक्रवारपासून सुरू केले आहे. ही लस अमेरिकन जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केली आहे.
कोवोवॅक्सचे उत्पादन सुरू झाल्याची घोषणा सीरमने ट्विटर केली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले, की कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचचे आमच्या पुण्यातील प्रकल्पामधून उत्पादन सुरू झाले आहे.
हेही वाचा-सीरमकडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतंय? - मोहन जोशी
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोवोवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्या देशात सुरू होणार असल्याचे मार्च २०२१ मध्ये म्हटले होते. ही लस सप्टेंबरमध्ये लाँच होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. सध्या कंपनीकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन घेण्यात येत आहे. ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकण्यात येत आहे.