महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cervical Cancer Vaccine Prices गर्भाशय कर्करोगावर लसीच्या किमतीबाबत अदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... - Cervical Cancer vaccine Prices

गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही Serum institute launch vaccine Cervical Cancer Vaccine स्वदेशी लस विकसित केली आहे. या लसीच्या किंमतीबाबत बोलताना सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी माहिती आहे. काही महिन्यातच आम्ही लसीची किंमत जाहीर करु, ती ती अंदाजे 200 ते 400 रुपये असेल. भारत सरकारसोबत उत्पादन आणि चर्चेनंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असेही अदर पूनावाला म्हणाले.

Serum CEO Adar Poonawala
Serum CEO Adar Poonawala

By

Published : Sep 1, 2022, 2:14 PM IST

Updated : Sep 1, 2022, 3:02 PM IST

मुंबईगर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही Serum institute launch vaccine Cervical Cancer Vaccine स्वदेशी लस विकसित केली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत. या लसीच्या किंमतीबाबत बोलताना सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी माहिती आहे. काही महिन्यातच आम्ही लसीची किंमत जाहीर करु, ती ती अंदाजे 200 ते 400 रुपये असेल. भारत सरकारसोबत उत्पादन आणि चर्चेनंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असेही अदर पूनावाला म्हणाले.

भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यूहोतो. या भयानक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने Serum Institute Cervical Cancer Vaccine तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही Serum institute launch vaccine Cervical Cancer Vaccine स्वदेशी लस विकसित केली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करण्यात आली आहे.

दरवर्षी सुमारे 67,000 महिलांचा मृत्यूसध्या जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध आहेत. पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस आणि दुसरी बायव्हॅलेंट लस आहे. जी सीरमने तयार केली आहे. हे हिपॅटायटीस बी लसीप्रमाणेच VLP Virus-like particles वर आधारित आहे. या लसीच्या आगमनामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यास मदत होणार असून या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतात गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये हे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर IARC-WHO नुसार, भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची 1.23 लाख प्रकरणे आढळतात. यामध्ये सुमारे 67,000 महिलांचा मृत्यू होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

दरवर्षी एक लाख २२ हजार ८४४ महिलांना कर्करोगाची लागण-गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे महिलांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. यावर सीरमचे सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक, प्रकाश कुमार सिंग यांनी 8 जून रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांच्याकडे एचपीव्ही लसीच्या फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अधिकृततेसाठी अर्ज केला होता. दरवर्षी भारतातील सुमारे एक लाख २२ हजार ८४४ महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे ६७ हजार, ४७७ महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो.

लहान मुलांसाठी सिरमची लस-कोव्होॅक्स, आता भारतात मुलांसाठी उपलब्ध आहे. भारतात उत्पादित केलेली ही एकमेव लस आहे जी युरोपमध्येही विकली जाते आणि तिची परिणामकारकता ९० टक्के आहे. आमच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणखी एक लस उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी हे सुसंगत आहे,” त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या आठवड्यात लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने 12-17 वयोगटासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हॅक्स कोविड -19 लसीला मान्यता दिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, सरकारने कोव्हॅक्सला आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी मंजुरी दिली होती.

हेही वाचाCervical Cancer Vaccine गर्भाशयाच्या कर्करोगावर सीरम इन्स्टिट्यूट आज लाँच करणार ' स्वदेशी लस'

Last Updated : Sep 1, 2022, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details