मुंबई -भारतात कोरोना लसीकरण (Corona vaccination) झपाट्याने होत आहे. तर कोरोना लसी घेण्यावरुन अजूनही बऱ्याच नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (CEO Adar Poonawala appeals) यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना साथीच्या रोगावर मात करण्यासाठी लसीचा संकोच हा आता सर्वात मोठा धोका आहे, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.
कोरोना लसीचा संकोच हाच सर्वात मोठा धोका - अदर पूनावाला - लसीचा संकोच हा आता सर्वात मोठा धोका आहे
राज्यांमध्ये 200 दशलक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. मी सर्व नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन करतो. या साथीच्या रोगावर मात करण्यासाठी लस संकोच हा आता सर्वात मोठा धोका आहे, असेही अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अदर पूनावाला
लस उद्योगाने राष्ट्रासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आज आपल्याकडे 200 दश लक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. मी सर्व नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन करतो. या साथीच्या रोगावर मात करण्यासाठी लस संकोच हा आता सर्वात मोठा धोका आहे, असेही अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा -Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 1003 नवे रुग्ण, 32 रुग्णांचा मृत्यू