महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक, जाणून घ्या सविस्तर - share market today

Share Market Update : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक 308 अंकांच्या उसळीसह 70,800 वर उघडला. त्याच वेळी, एनएसईवर निफ्टी 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 21,279 वर उघडलाय.

Share Market Update
Share Market Update

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 11:24 AM IST

मुंबई Share Market Update : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. रेल्वे मंत्रालयानं टेक्समॅको रेल कंपनीला 1,374.41 कोटी रुपयांच्या 3,400 BOXNS वॅगनचं उत्पादन आणि पुरवठ्यासाठी ऑर्डर दिलीय. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालीय. टेक्समॅको रेलचे शेअर्स 8 टक्क्यांनी वाढले आहेत

गुरुवारी काय होती परिस्थिती : यूएस फेडरल रिझर्व्हनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2024 मध्ये दर कपातीचे संकेत दिले. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सकारात्मक चित्र निर्माण झाले. आठवड्याच्या चौथ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 983 अंकांच्या उसळीसह 70,528 वर बंद झाला. त्याच वेळी NSE निफ्टी 1.31 टक्क्यांच्या वाढीसह 21,198 वर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये 1,000 अंकांनी वाढ : ट्रेडिंग दरम्यान, टेक महिंद्रा, LTIMindTree, Infosys, HCL Tech यांचा टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता. त्याच वेळी एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड, टाटा कंझ्युमर, नेस्ले इंडियाचे व्यवहार घसरले. माहिती तंत्रज्ञान आणि रिअल्टी समभागांमध्ये वाढीसह सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते. त्याच वेळी, काल दिवसभरात शेअर बाजाराचा निर्देशांक 1,000 अंकांनी वाढला.

जागतिक बाजारातून चांगले संकेत : जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. आशियातील शेअर बाजारांमध्ये दमदार सुरुवात झाली. गिफ्टी निफ्टी सुद्धा 0.25 टक्क्यांनी वधारत आहे. अमेरिकन बाजारातही उत्साह वाढला आहे. बुधवारी डाऊ जोन्स सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पातळीवर बंद झाला. S&P 500 समभागांपैकी 48 टक्के RSI 70 पेक्षा जास्त आहे. टेक शेअर्समध्ये दबाव होता. Adobe चा स्टॉक काल 6 टक्क्यांहून अधिक घसरला. चौथ्या तिमाहीत कंपनीची कमाई अपेक्षेपेक्षा कमी होती. डॉलरच्या कमजोरीमुळं कमोडिटीजमध्ये वाढ झालीय.

हेही वाचा :

  1. शेअर बाजारात चांगलीच तेजी; सेंसेक्स 500 अंकानं उसळला, निफ्टी 21 हजार 110 अंकावर
  2. शेअर बाजारावर भाजपाच्या विजयाचा इफेक्ट; सेन्सेक्स प्रथमच 68,000 पार, गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 4 लाख कोटी

ABOUT THE AUTHOR

...view details