मुंबई: जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास 400 अंकांनी घसरला ( SENSEX LOSES 400 POINTS IN EARLY TRADE ) आहे. जागतिक बाजारात होत असलेल्या घडामोडींचे परिणाम सेन्सेक्सवर दिसून येत ( Share Market Update ) आहेत.
बीएसई, निफ्टीही घसरला :BSE बेंचमार्क सेन्सेक्स 399.69 अंकांनी घसरून 52,619.25 वर व्यवहार करत होता. NSE निफ्टी 130.25 अंकांनी घसरून 15,650 वर ( NIFTY FALLS 130 POINTS ) आला. सेन्सेक्स पॅकमध्ये, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, टायटन, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक हे प्रमुख पिछाडीवर होते. एशियन पेंट्स, आयटीसी, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि पॉवर ग्रिड हे शेअर्स वाढले.