कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, सोमवारी संध्याकाळपासून त्यांचा शोध लागत नाही. माजी रेल्वेमंत्र्यांचा मुलगा सुभ्राग्शु याने सांगितले की, त्यांचे वडील सोमवारी संध्याकाळपासून 'बेपत्ता' आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुभ्राग्शु म्हणाले की, आतापर्यंत मी माझ्या वडिलांशी संपर्क साधू शकलो नाही. ते बेपत्ता आहे. रॉय यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, ते सोमवारी संध्याकाळी दिल्लीला जाणार होते.
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल :एका जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, या क्षणी आम्हाला माहित आहे की, ते रात्री 9 वाजता दिल्ली विमानतळावर उतरणार होते. मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही. सोमवारी संध्याकाळी मुकुल रॉय इंडिगो या फ्लाइटने दिल्लीला रवाना झाले होते. जे सोमवारी रात्री उशिरा रात्री ९.५५ वाजता दिल्लीला पोहोचणार होते. मात्र आता रॉय हे बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मुलगा सुभ्राग्शु रॉय यांनी दावा केला आहे की, कुटुंबाने विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, तर पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही.