नवी दिल्ली- काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत (CWC meeting) काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी विनंती केली. त्यावर राहुल गांधी यांनी मी विचार करणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या विचारसणीबाबत नेत्यांमध्ये स्पष्टता हवी.
निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी काम करावे, असे काही नेत्यांनी म्हटल्याचे सुत्राने सांगितले. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे काँग्रेसच्या कार्यकारिणीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून आपण काम करत असल्याचेही सोनिया गांधी यांनी या बैठकीत म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-CWC बैठकीत G-23 नेत्यांना सोनिया गांधीचे उत्तर...'मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष'
२४ अकबर रोड कार्यालयात बैठक
सद्य राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यालय 24 अकबर रोड येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.