मुंबई - कन्नड साहित्यीक डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे आज सोमवारी (दि. 10 जानेवारी)रोजी सकाळी 6:30 वाजता बंबेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. पाटील यांचा जन्म हावेरी जिल्ह्यातील हत्तीमत्तूर येथे 1939 मध्ये झाला. 1956 मध्ये त्यांनी कर्नाटक कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1960 मध्ये बी. ए. पुर्ण केले. तसेच, पुढे त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून 1962 मध्ये एम.ए पूर्ण केले. १९६९ मध्ये ते कर्नाटक विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
2004 ते 2008 या काळात कन्नड साहित्य सभेचे अध्यक्ष म्हणूनही काम
1980-83 मध्ये धारवाडमधील अखिल-कर्नाटक केंद्र कृषकम समितीचे सरचिटणीस म्हणून गोकाक चळवळीला प्रेरणा देणार्या प्रमुख व्यक्तींपैकी चंद्रकांत पाटील हे एक होते. नोव्हेंबर 2004 ते 2008 या काळात त्यांनी कन्नड साहित्य सभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर इंटर-थिएटर कोलिशन सारख्या संस्थांद्वारे नाट्यक्षेत्रातही त्यांनी सक्रिय काम केले आहे. 1970 च्या सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
त्यांच्या भाषेबद्दलच्या सचोटीबाबत कोणीही शंका घेऊ शकत नाही
चंद्रशेखर पाटील यांना 2018 मध्ये मुरुघा मठाच्या बसव केंद्रातर्फे दिला जाणाऱ्या बसवश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मठाचे धर्मगुरू डॉ. शिवमूर्ती मुरुघा शरणा हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर जनतेला संबोधित करताना म्हणाले होते की, प्रा. चंद्रशेखर पाटील यांनी त्यांच्या हयातीत कन्नड भाषेला समृद्ध करण्याचे काम केले आहे. तसेच, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भाषा विकासाचे मोठे काम झाले आहे असही ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेबद्दलच्या सचोटीबाबत कोणीही शंका घेऊ शकत नाही. चंद्रशेखर पाटील हा आवाजहीनांचा आवाज आहे. असही यावेळी कुरूघा म्हणाले होते.
बंड्या चळवळ
बंड्या चळवळचळवळ ही कन्नडमधील एक पुरोगामी (विद्रोही) साहित्यिक चळवळ आहे. ज्याची सुरुवात डी. आर. नागराज आणि शुद्र श्रीनिवास यांनी 1974 मध्ये केली होती. या चळवळीने सामाजिक बांधिलकी असलेल्या साहित्याचा प्रचार केला आणि कवितेला सामाजिक आणि आर्थिक अन्यायाविरुद्ध शस्त्र बनवण्याचा प्रयत्न केला. या चळवळीत लेखक चंद्रशेखर पाटील यांचा महत्वाचा वाटा आहे. याबरोबरच गोकाक आंदोलन, आणीबाणी विरोधी आंदोलन, मंडल अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन, शेतकरी आंदोलन इत्यादी अनेक सामाजिक आणि साहित्यिक चळवळींचे नेतृत्व चंद्रशेखर पाटील यांनी केले होते. त्याच्या निधनाने साहित्य वर्तुळासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकंनी शोक व्यक्त केला आहे.