पणजी - एनडीएमधूनबाहेर पडल्यानंतर शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. शिवसेनेने साथ दिल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस त्यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीत युती करणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी सांगितले. ते पत्रकार परिषेदत बोलत होते.
गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेस सबत युती करून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संजय राऊत यांनी नुकतीच प्रियांका गांधी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चाही केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने आम्हाला साथ दिल्यास आम्ही नक्कीच युतीचा विचार करणार असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री व राज्याचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी सांगितले.
यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देणार-
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी पक्षाला धोका दिला. ती चूक आता पुन्हा होणार नसल्याचे ही चिदंबरम यांनी सांगितले.
काँग्रेसने युपीएला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत
काँग्रेसने युपीएला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम ( senior congress leader P Chidambaram ) यांनी व्यक्त केले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. आमचा वेगळा दृष्टीकोन आहे. जर दोन्ही एकत्रित आले तर देशासाठी चांगले असेल, असे मत माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी व्यक्त केले.
गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची ( Goa Assembly election 2022 ) यादी काँग्रेस ( Goa congress candidates list ) लवकरच जाहीर करणार आहे. भाजपशिवाय देशात विरोधकांची आघाडी करण्याचे वक्तव्य संजय राऊत ( Sanjay Raut on opposition in the country ) यांनी नुकतेच केले होते.
हेही वाचा-गोवा विधानसभा निवडणुकीत सर्व 40 जागा लढणार; मनीष सिसोदिया यांची घोषणा