लखनऊ ( उत्तरप्रदेश ) : बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश चंद्र मिश्रा ( senior bsp leader satish mishra ) आणि बसपा आमदार उमाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली ( bsp leader satish mishra met cm yogi ) आहे. बसपाच्या काळात बांधलेल्या स्मारकांच्या देखभालीचा सविस्तर पाहणी अहवाल दोन्ही बसप नेत्यांनी मुख्यमंत्री योगी ( CM Yogi Adityanath ) यांना दिला. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले ( BSP Leader Met Yogi Adityanath ) आहे.
स्मारकांच्या नावाखाली झाला भ्रष्टाचार : बहुजन समाज पक्षाचे सरकार उत्तरप्रदेशात असताना स्मारकांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला ( BSP memorial scam ) होता. त्याची चौकशीही करण्यात आली होती. असे असताना आता बसपाचे नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट झाल्याने ( BSP Leader Meet Yogi Adityanath ) अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. आता या दोन बसप नेत्यांच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर सर्व प्रकारचे अर्थ काढले जात आहेत.
भाजप मायावतींना कधी राष्ट्रपती करत आहे :बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा आणि विधिमंडळ पक्षाचे नेते उमाशंकर सिंह यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून सर्व राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी घाईगडबडीत मायावतींनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. तसेच अखिलेश यांच्या 'भाजप मायावतींना कधी राष्ट्रपती करत आहे' या विधानावर हल्लाबोल केला.
तर मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होईन :बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की, भाजप त्यांना राष्ट्रपती करत असल्याचा संशय समाजात पसरवला जात आहे. ही सपाची जाणीवपूर्वक केलेली खेळी आहे. दलित-मुस्लिम आणि गरीब उच्चवर्णीय बसपाचे होते आणि ते बसपच्या समर्थनात आहेत. जर मला त्यांचा पाठिंबा मिळत राहिला तर मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होईन, मी कधीही राष्ट्रपती होणार नाही. याशिवाय विधानसभा निवडणुकीत बसपाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे सपा आणि भाजपमधील अंतर्गत मिलीभगत आहे. त्यामुळे निवडणुकीला हिंदू-मुस्लिम रंग देण्यात आला. आता ते होणार नाही. लोकांना सर्व काही समजले आहे.
हेही वाचा : Loudspeaker Controversy : अखेर निर्णय झालाच.. सर्व अवैध भोंगे काढून काढून टाकण्याचे आदेश.. योगींची कारवाई