श्रीनगर (उत्तराखंड) Ram Mandir Pratisthapana :येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि गढवाल केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा आर सी भट्ट यांनी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना का केली जाते याविषयी माहिती दिलीय.
प्राणप्रतिष्ठापनेचे महत्त्व :यासंदर्भात बोलत असताना आर सी भट्ट म्हणाले की, आपल्या देशातील धार्मिक आणि सामाजिक जीवनात प्रभु श्रीरामाचे खूप महत्त्व आहे. भारतातील सनातन संस्कृतीतील इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या संकल्पनेपेक्षा आपली संकल्पना वेगळी आहे. भारतीय संस्कृतीत मंदिर हे केवळ प्रार्थनेचं ठिकाण नाही तर ते पूजास्थानही आहे. त्याचे नियम भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आलेत. या संदर्भात पाचव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत विविध वास्तुशास्त्रीय ग्रंथांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये मंदिर स्थापत्यशास्त्राबाबत अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ज्याप्रमाणे मानवी शरीराचे अवयव असतात, त्याचप्रमाणे मंदिराचेही भाग असतात.
मानवी शरीराप्रमाणेच मंदिराचेही भाग असतात : मंदिराच्या सर्वात वरच्या भागाला शीश (शीर्ष) म्हणतात. त्याचप्रमाणे मंदिरात मूल (पाया), गर्भगृह मसरक (पाया आणि भिंतींमधील भाग), जंघा (भिंत), कपोत (कर्णिस), शिखर, गल (मान), गोलाकार अमलक आहेत. याचं कारण म्हणजे मंदिराची संकल्पना जिवंत प्राण्यासारखी असते. मानवी शरीरात आत्मा (जीव) असल्याशिवाय ते जिवंत होणार नाही. तसंच मंदिराच्या अंगात प्राण असल्याशिवाय ते जिवंत मानले जाणार नाही आणि मंदिरातील गाभार्यातील मूर्तीत प्राण आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा मंदिरात पूजा सुरू होते, तेव्हा त्या मूर्तीच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला प्राणप्रतिष्ठापना म्हणतात. त्यामुळं त्या दिवसापासून मंदिर जिवंत मानलं जातं. म्हणूनच सनातन धर्मात संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा केली जाते. तसंच मूर्तीची जितकी पूजा केली जाते तितकीच मंदिराची पूजा केली जाते.
हेही वाचा -
- माता सीतेकरिता मुस्लिम कारागीरांकडून तयार करण्यात येणार खास पैंजण, जाणून घ्या पैंजणाचे वैशिष्ट्ये
- अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील भाविकांसाठी विनामूल्य औषधांचे ट्रक झाले रवाना
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा : वाराणसीमध्ये तयार करण्यात आली पुजेची विशेष भांडी