वॉशिंग्टन: अमेरिकेने म्हटले आहे की रशियाने भारताला एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची विक्री केल्याने प्रदेशात आणि बाहेर अस्थिरता निर्माण करण्यात मॉस्कोची भूमिका दिसून येते (Selling S-400s India shows Russias role). भारताने रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. भारताने सांगितले आहे की, आपले निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितावर आधारित आहे.
भारताला S-400 विकणे अस्थिरता निर्माण करण्यात रशियाची भूमिका असल्याचे दर्शवते - अमेरिका - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस
रशियाने भारताला S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची विक्री केल्याने (Russia sells S-400 missile defense India), या प्रदेशात आणि त्यापलीकडे अस्थिरता निर्माण करण्यात मॉस्कोची भूमिका दिसून येते, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस (US State Department spokesman Ned Price ) गुरुवारी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, एस-400 प्रणाली बाबत ज्या आमच्या चिंता आहेत, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. मला वाटते की, हे या प्रदेशात आणि संभाव्यतः पलीकडे अस्थिरता निर्माण करण्यात रशियाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते.
प्राइस यांना रशियन एस-400 प्रणालीचा अमेरिका-भारत संबंधांवर होणार्या परिणामाबद्दल विचारण्यात आले होते, ज्यावर उत्तर देताना त्यांनी ही गोष्ट बाब निदर्शनास आणून दिली. अमेरिके कडून ही टिप्पणी अशा वेळी करण्यात आली आहे. जेव्हा अमेरिका आणि रशिया युक्रेनवर आमनेसामने आहेत. अमेरिकेचा तीव्र आक्षेप आणि जो बिडेन प्रशासनाकडून (Joe Biden Administration) निर्बंधांचा इशारा देऊनही, भारताने क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयात कोणताही बदल करण्यास नकार दिला आहे. प्राइस म्हणाले, "मग तो भारत असो किंवा इतर कोणताही देश, आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की, शस्त्रास्त्र प्रणालींबाबत रशियाशी कोणताही नवीन व्यवहार टाळावे".