नवी दिल्ली - ताजमहालचे तिकीट बुक करण्यासाठी ( Taj Mahal Ticket Booking ) बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या एका भामट्याला गुन्हे शाखेने अटक केली ( One Arrested Taj Mahal Fake WebSite ) आहे. पुरातत्व विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. संदिप चंद असे या आरोपीचे नाव असून, तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
याबाबत पोलीस आयुक्त मनोज सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, www.agramonuments.in या नावाची आरोपीनी वेबसाईट तयार केली होती. यावर नागरिक जेव्हा तिकीट बुकींग करण्यासाठी जायचे तेव्हा पैसे घेतले जायचे. मात्र, तिकीट मिळत नव्हते. याबाबत तक्रार पुरातत्व विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास सुरु केला.
तपासावेळी आरोपी आपली जागा सातत्याने बदलत होता. अधिक तपास केला असता पोलिसांनी उत्तराखंड येथून संदिप चंदला अटक केली. संदीप हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, तो नोएडा येथील एका कंपनीत काम करत होता. कोरोना लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली होती.
पोलिसांना संदिपने चौकशीत सांगितले की, इंटरनेटवर बहुतेक नागरिक ताजमहालला भेट देण्यासाठी ऑनलाइन बुकिंग ( Taj Mahal Ticket Booking ) करतात. त्यावरुन त्याला बनावट वेबसाइट तयार करण्याची कल्पना सुचली. संदिपने सायन्समधून बी.टेक केले आहे. तो नोएडामधील एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
हेही वाचा -Naxals burn Vehicles : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ; रस्त्यांच्या कामाला विरोध