नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला आहे. आम्ही पंतप्रधानांसमवेत आरोग्य क्षेत्र हे पुढे कसे नेता येईल व भविष्यात महामारीची तयारी कशी करायची याबाबत चर्चा केली आहे. आम्ही सतत क्षमता विस्तारत आहोत, अशी माहिती सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांच्याशी संवाद साधला. या संवादानंतर सीरमचे आदर पुनावाला यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारातून आरोग्य सेवा उद्योगाने सरकारसोबत काम केले आणि हा मोठा टप्पा गाठला. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली ज्यामुळे लसी उद्योगाला पुढे नेण्यास मदत होईल. जगभरात, देश आता लस निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहेत आणि भारताला पुढे राहण्याची गरज आहे. आम्ही ते उद्योग आणि सरकारसह काम कसे करावे, याबद्दलही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारदेखील उपस्थित होत्या.