महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Seema Haider : सीमा हैदरचे भारत प्रेम, दिल्या हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा; Watch Video - Seema Haider raised Hindustan Zindabad

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने रविवारी 'हर घर तिरंगा' मोहिमेत भाग घेतला. यावेळी तिने पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच तिने, 'मी आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी हो म्हटलेले नाही', असे स्पष्ट केले. (Seema Haider Hindustan Zindabad) (Seema Haider Pakistan murdabad)

Seema Haider
सीमा हैदर

By

Published : Aug 14, 2023, 4:26 PM IST

पहा व्हिडिओ

नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने कुटुंबासह घरावर तिरंगा ध्वज फडकावला. या दरम्यान तिने हिंदुस्थान जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. यासोबतच तिने भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देखील दिल्या. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग : सीमा हैदर, तिचा पती सचिन मीणा आणि सीमाचे वकील ए पी सिंह यांनी रविवारी 'हर घर तिरंगा' मोहिमेत भाग घेतला. यावेळी त्यांनी त्यांच्या घराच्या छतावर तिरंगा ध्वज फडकावला. यासोबतच सीमा हैदरने आपल्या घरात तुळशीचे एक रोपही लावले आहे. 'माझा भारत सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठिंबा आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आम्ही आमच्या घराच्या छतावर तिरंगा ध्वज फडकावला', असे सीमा हैदर यावेळी बोलताना म्हणाली.

सीमा भारतीय पोषाखात दिसली : तिरंगा ध्वज फडकवताना सीमा पूर्णपणे भारतीय सांस्कृतिक पोषाखात दिसली. या दरम्यान तिने तिरंगा प्रिंटची साडी नेसली होती. तर डोक्यावर 'जय माता दी' असे लिहिलेली चुनरी बांधली होती. यासोबतच सीमाने तिच्या गळ्यात तिरंगी ओढणीही गुंडाळली होती. यावेळी उपस्थित सर्वांच्या हातात तिरंगा झेंडा दिसत होता.

मी कोणत्याही चित्रपटासाठी हो म्हटलेले नाही : यादरम्यान बोलताना सीमा हैदरने एक मोठे वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी सीमा बॉलीवूड चित्रपटात काम करणार आहे, अशा बातम्या आल्या होत्या. तसेच तिला एका चित्रपटाचीही ऑफर आली असल्याचे बोलले जात होते. मात्र, 'मी कोणत्याही चित्रपटात काम करत नाही. जे दिग्दर्शक मला घरी भेटायला आले होते, ते वकिलाचे नाव घेऊन माझ्याशी बोलले. आतापर्यंत मी कोणत्याही चित्रपटासाठी हो म्हटलेले नाही', असे सीमा हैदरने म्हटले आहे. दुसरीकडे मनसे चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात संधी दिली जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. त्यांनीही सीमाच्या चित्रपट प्रवेशासंदर्भात एक खरमरीत ट्विट केले होते.

सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट येणार : निर्माता-दिग्दर्शक अमित जानी 'कराची टू नोएडा' नावाचा एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटात सीमा आणि सचिन यांची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपटासाठी ऑडिशन्स घेण्यात आल्या असून चित्रपटाचे एक गाणेही यूट्यूबवर लाँच करण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. Seema Haider : सीमा हैदर होणार 'रॉ एजंट', चित्रपटातील भूमिकेसाठी दिली ऑडिशन
  2. Seema Haider : सीमा हैदरला चक्क चित्रपटात भूमिकेची ऑफर, जाणून घ्या कोण देतय संधी
  3. Seema Haider : 'अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरला का नाही?', सीमाच्या वकिलांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details