बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात मंगळवारी काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादातून पत्नीने पतीवर विटेने हल्ला करण्यासाठी धाव घेतली. पतीने या हल्ल्यातून स्वत:ला वाचवले, पण या घटनेमुळे तो खूप दुखावला गेला. पत्नीच्या रागाला कंटाळून पतीने राहत्या घरी अखेर आत्महत्या केली. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यासोबतच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, त्यांचा कशावरून वाद होता हे अद्याप समोर आले नाही.
पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते : कोठी पोलीस स्टेशन परिसरातील लालपूर मजरे इब्राहिमाबाद येथील रहिवासी दुखीराम यांनी सांगितले की, त्याचा पुतण्या रविशंकर (२५) याचे जैदपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील वैसपूर येथील रहिवासी असलेल्या मनीषासोबत एक वर्षापूर्वी (११ मे २०२२)रोजी लग्न झाले होते. रविशंकर मजुरी करून घर सांभाळायचे. मात्र, पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. सोमवारी सायंकाळी पती-पत्नीमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यासोबतच मंगळवारी दुपारीही दोघांमध्ये वाद झाला.