नवी दिल्ली -कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज 7 महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढली. शेतकरी राज्यपालांना निवेदन सोवपणार आहेत. गेल्या सात महिन्यांत सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण समस्या सुटू शकलेली नाही. आज पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्यपालांना निवेदन देतील व शेतकर्यांच्या समस्या मांडतील. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील उपराज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
आंदोलनाला आज 7 महिने पूर्ण झाले आहेत. दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करत आहेत. सरकारची जेव्हा इच्छा असेल. तेव्हा चर्चा सुरू करू शकते. आमचे आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले.
शेतकरी शांततेत आपले आंदोलन सुरू ठेवतील. शेतकर्यांच्या समस्यांबाबत सर्व राज्यांच्या राज्यपालांना निवेदन देण्यात येईल. शेतकरी चळवळीला जवळपास 7 महिने पूर्ण होत आहेत. देशातील शेतकरी आज संकटात सापडला आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, असे बीकेयू अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले.