श्रीनगर -मंगळवारी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि काश्मीरमधील इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तपासणी चौक्यात वाढ
सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी वाहनांची आणि नागरिकांची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील व इतर जिल्हा मुख्यालयांमधील महत्वाच्या आस्थापनांसाठी सुरक्षा दलांची उपस्थिती वाढवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून शहरात अधिक चौक्या तयार करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.