चंदीगढ : पंजाबमधील चंदीगडच्या सेक्टर ३४मधील एका बँकेत मोठी चोरी झाली. ही चोरी दुसऱ्या कोणी नाही, तर बँकेच्या सुरक्षारक्षकानेच केली. रविवारी सकाळी सुमित नावाच्या सुरक्षा रक्षकाने तब्बल ४.०४ कोटी रुपये घेत पळ काढल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित हा मोहालीच्या सोहानामधील रहिवासी होता. गेल्या तीन वर्षांपासून तो अॅक्सिस बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. एटीएममध्ये टाकण्यासाठी म्हणून बँकेच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवण्यात आली होती. हीच संधी साधून तो हे पैसे घेऊन पसार झाला.