लातेहार :झारखंड राज्यातील लातेहारमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एसपी अंजनी अंजन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने बुधा पहाड परिसरात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटके आणि इतर वस्तूंचा मोठा साठा जप्त करून नष्ट केला (Huge quantity of explosives from Budha Pahar) आहे. बुधा पहाड परिसरात नक्षलवाद्यांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना धक्का बसला आहे.
नक्षलद्यांकडून स्फोटके जप्त - बुधा पहाडच्या जोकपाणी भागात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे लपवून ठेवल्याची गुप्त माहिती एसपी अंजनी अंजन यांना मिळाली होती. या माहितीवरून जिल्हा पोलीस, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनने संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी सुरक्षा दलांनी 120 टिफिन बॉम्ब, एक आयडी बॉम्ब, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी बॅनर, कोडेक्स वायर आणि बुधा पहाडवर लपवून ठेवलेले इतर सामान जप्त केले आहे.