महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Encounter in Jammu Kashmir: सुरक्षा दलाकडून दहशतवाद्याचा चकमकीत खात्मा, राजौरीच्या जंगलात शोधमोहिम सुरू

आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील दसल जंगलात मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

Encounter in Jammu Kashmi
जम्मू काश्मीरमध्ये चकमक

By

Published : Jun 2, 2023, 10:23 AM IST

Updated : Jun 2, 2023, 11:11 AM IST

कारवाईत एक दहशतवादी ठार

श्रीनगर :जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. परिसरात किती दहशतवादी लपून बसलेले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.

सुरक्षा दलांनी परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांना जाळ्यात पकडण्याकरिता शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये, याकरिता स्थानिक पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातील दसल जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीवरून परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली.

संपूर्ण परिसराची नाकेबंदी :दहशतवाद्यांनी लपून सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. चकमकीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीदेखील परिसरात गस्त वाढवली आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी या भागातून पळून जाणार नाहीत, याची सुरक्षा दलाकडून काळजी घेण्यात येत आहे. कोणालाही चकमकीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

दहशवाद्याच्या मालमत्तेवर जप्ती:घनदाट जंगल असल्याने सुरक्षा दलांना कारवाई करण्यात मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या एका साथीदाराची मालमत्ता जप्त केली. तपास संस्थेने अनंतनाग जिल्ह्यातील दानवथपोरा कोकरनाग भागात दहशतवाद्याच्या साथीदाराची बांधकामाधीन इमारत ताब्यात घेतली आहे. या संपत्तीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य तपास संस्थेकडून दहशतवाद्यांची आर्थिक नाकाबंदी-राज्य तपास संस्थेने (एसआयए) काश्मीरने गुरुवारी दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. एसआयएच्या एका अधिकाऱ्याने ईटीव्ही इंडियाला सांगितले की, राज्य तपास संस्थेच्या (एसआयए) अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफच्या मदतीने दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहे. अनंतनाग जिल्ह्यात एसआयएने सेमथान बिजबेहारा आणि चत्तरजुल शांगास येथे छापे टाकले. अधिकाऱ्याने सांगितले की, एसआयए काश्मीर पोलिस स्टेशनमध्ये अल्पसंख्याक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा-

  1. Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई
  2. Pakistani Drone in Amritsar : ड्रग्जची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन पुलमोरा सीमारेषेवर सुरक्षा जवानांनी पाडले
Last Updated : Jun 2, 2023, 11:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details