सुकमा -सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार करुन पळणाऱ्या नक्षलवाद्यांच्या सुरक्षा दलाने सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी मुसक्या आवळल्या आहेत. या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केले. जहाल नक्षलवादी विजापूरच्या बासागुडा, गांगलूर आणि किरंदुल या सीमावर्ती भागात जमा झाल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. दंतेवाडा आणि विजापूरची डीआरजी टीम, एसटीएफ, महिला कमांडो आणि कोब्रा 210 यांची संयुक्त टीम पिडिया गावच्या जंगलात गेली होती. यावेळी इडनारच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
पळून जाणारे 3 नक्षलवादी अटक :सुरक्षा दलांवर गोळीबार करुन नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले होते. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबारामुळे नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाच्या आडून पळून गेले. यावेळी झडतीदरम्यान 8-10 संशयीत पळताना दिसले. त्यांना सुरक्षा दलांनी वेढा घालून पकडले. यामध्ये 02 महिला आणि 01 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यात गुड्डू कुसराम गांगलूर ( एलओएस सदस्य) , महिला नक्षलवादी हुंगी अवलम ( पक्ष सदस्य) , संघटना सदस्य इडो असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. सुरक्षा दलाने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामान जप्त केले आहे.
नक्षलवाद्यांकडून दारूगोळा जप्त : सुरक्षा दलाने अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून टिफिन बॉम्ब, जिलेटिन रॉड, कार्डेक्स वायर, डिटोनेटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी, प्लास्टिक मेम्ब्रेन जप्त केले. सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत नक्षलवादी गुड्डू गांगलूरवर एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
नक्षलवाद्यांनी रचलेल्या रणनीतीवर फिरले पाणी :सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना अटक करुन गांगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना विजापूर न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक खुलासे झाले आहेत. सुरक्षा दल या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे आणखी नक्षलवादी पकडले जाण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांच्या अनेक ठिकाणांबाबत माहिती मिळत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी आखलेल्या रणनीतीवर पाणी फेरले जात आहे.