बुरहानपूर - पत्नी मुमताजची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुघल बादशाह शाहजहाने ताजमहल ( Taj Mahal ) बांधून आपल्या पत्नीला पिढानपिढ्या प्रेमाचे प्रतिक राहिल अशी भेट दिली. जे जगातील एक आर्श्चय आहे. आता बुरहानपूरच्या एका 'शाहजहा'ने आपल्या पत्नीला 'ताज महल' भेट दिला आहे. ज्याची चर्चा सगळीकडे होत आहे. बुरहानपूरचे शिक्षणतज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्या पत्नी मंजूषा चौकसे यांना ताजमहल सारखा 4 बेडरूम असलेले घर भेट दिले आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4 बेडरूम असलेले ताजमहल सारखे घर -
बुरहानपूर येथील शिक्षणतज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी आपले घर हुबेहुब ताजमहल ( Taj Mahal ) सारखे बनवले आहे. 3 वर्षांत बनवलेल्या या घरात 4 बेडरूम आहेत. ज्यात 2 बेडरूम खाली तर 2 बेडरूम वरती आहेत. यामध्ये एक मोठा हॉल, किचन, लाइब्रेरी आणि मेडिटेशन रूम देखील आहे.
घराला इंडियन कंस्ट्रक्टिंग अल्ट्राटेक आउट स्टैंडिंग स्ट्रक्चर ऑफ मध्यप्रदेश हा पुरस्कार मिळालेला आहे. ज्याला आनंद चौकसे यांनी आपल्या पत्नी मंजूषा चौकसे यांना गिफ्ट केले आहे.