नवी दिल्ली -रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (russia-ukraine war) आज (२ मार्च) पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. चंदन जिंदाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव (Indian Student Killed in Ukraine) आहे. हा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. चंदन हा युक्रेमधील विनीसिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तर कालच गोळीबारात (Firing) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
मंगळवारी खारकीव शहरात झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २४ तासांत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आजारपणामुळे चंदनचा मृत्यू -
विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा चंदन जिंदल हा विद्यार्थी आजारी पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. उपचारावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. चंदनच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्याने त्याला खारकीवमधील शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या कुटुबियांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.
लवकरात लवकर खारकीव सोडण्याचे भारतीयांना आदेश -
भारतीयांनी तातडीने खारकीव सोडण्याचे आदेश भारतीय दुतावासाने दिले आहेत. शक्य तितक्या लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबेकडे जाण्याचा सल्ला दुतावासीने जारी केला आहे. सध्या खारकीवमधील परिस्थिती गंभीर बनत आहे. त्यामुळे तेथील भारतीयांनी लवकरात लवकर खारकीव भाग सोडण्याच्या सूचना तेथील भारतीय दुतावासाने दिल्या आहेत.
कालच युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू -
रशियाने युक्रेनच्या खारकीवमध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मंगळवारी एका ( indian student lost his life in shelling in kharkiv ) भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. युक्रेनच्या खारकीवमध्ये मंगळवारी सकाळी बॉम्ब हल्ले करण्यात आले. या बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. हा विद्यार्थी फक्त २१ वर्षांचा होता आणि तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता.
भारतीयांना मायदेशात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न -
अनेक भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून सतत गोळीबार, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. या युद्धाची मोठी झळ भारतालाही बसत असल्याचे दिसून येत आहे.