तामिळनाडू -सामाजिक कार्यकर्ते थिरुमारन हे गेल्या ५५ वर्षांपासून मलेशियामध्ये आपल्या वडिलांची कबर कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. मलेशियातील कबरींची नियमित देखभाल न केल्यास कालांतराने गायब होतात. त्यामुळे आपल्या वडिलांची कबरही कालांतराने नष्ट होईल, असे तिरुमारन यांना वाटत होते. मात्र, थिरुमारन यांना आयुष्यात एकदा तरी वडिलांची कबर कुठे आहे हे पाहण्याची इच्छा होती. शेवटी त्यांनी गुगलच्या माध्यमातून वडिलांची कबर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुगलवर तिरुमारन कुटुंब जेथे राहत होते तेथे स्मशानभूमी आहे का? असे सर्च केले असता गर्लिंग गार्डन स्मशानभूमीचे चित्र आले. वडिलांच्या कबरीचे नाव आणि फोटो पाहून थिरुमारनला धक्काच बसला! (Search of fathers grave through Google). (son went to Malaysia for fathers grave).
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन - 55 वर्षांपासून न सापडलेली आपल्या वडिलांची कबर अवघ्या एका मिनिटात सापडल्याने थिरुमारन यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी ताबडतोब मलेशियाला जाऊन वडिलांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वडिलांची कबर पाहिली. दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना थिरुमरनच्या शोध घटनेची माहिती मिळाली. त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि ट्विट केले. ‘माणूस हा भावनांनी बनलेला असतो आणि आपल्या आयुष्याचा प्रवास प्रेमाच्या शोधात होतो’ असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी थिरुमरन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.