डेहराडून : सहसपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पावसाळी नदीला अचानक पूर आला. त्यामुळे नदीत बांधलेल्या बेटावर काही लोक ( People stranded in River ) अडकले. घाईघाईत त्यांनी पोलिस आणि एसडीआरएफला याची माहिती दिली. माहिती मिळताच एसडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहोचून त्यांची सुटका केली.
flood in Sahaspur : मुसळधार पावसामुळे पुरात अडकले नागरिक, एसडीआरएफच्या टीमने वाचविले जीव - बरसाती नदीने धोक्याची पातळी ओलांडली
सहसपूरमध्ये नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे बेटावर अडकलेल्या पाच जणांचा जीव टांगणीला लागला. एसडीआरएफच्या टीमने बेटावर अडकलेल्या लोकांना ( People stranded in River ) बाहेर काढले. अंधार आणि पाण्याची वाढती पातळी यामुळे बचावकार्यात टीमला बराच घाम गाळावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीउशिरा सहसपूर परिसरात पावसाळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे बेटावर पाच जण अडकले. पाण्याची वाढती पातळी पाहून नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांनी मदतीची याचना केली. दरम्यान, बेटावर अडकल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर SDRF (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) ला आपत्ती नियंत्रण कक्ष, डेहराडून येथून घटनेची माहिती देण्यात आली.
त्याचवेळी माहिती मिळताचसहस्त्रधारा आणि डाकपठार येथील एसडीआरएफचे पथक तातडीने बचावकार्यासाठी रवाना झाले. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. यादरम्यान प्रचंड अंधार आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बचावकार्यात मोठी कसरत करावी लागली. या टीमने बेटावर अडकलेल्या 5 लोकांना तराफांच्या माध्यमातून सुरक्षित किनाऱ्यावर आणले. त्याचवेळी बेटावर अडकलेल्या लोकांनी सुरक्षित बचावासाठी एसडीआरएफ टीमचे आभार मानले.