नवी दिल्ली/गाझियाबाद -सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही महिला रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत आहेत. शेजारी महिला अधिकारी उभ्या आहेत. महिला अधिकारी आणि आंदोलक महिला यांच्यात ( SDMs verabal fight in Ghaziabad ) जोरदार वाद झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मोदीनगरचा आहे. मोदीनगर रस्ता अपघातात अनुराग ( Modinagar road Anurag Accident ) या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी गुरुवारी सकाळी गाझियाबाद-मेरठ महामार्गावर ( protest at Gaziabad Merath road ) निदर्शने केली. रस्ता अडविल्याची माहिती मिळताच मोदी नगरच्या एसडीएम शुभांगी शुक्ला घटनास्थळी ( sdm shubhangi shukla viral video ) पोहोचल्या. त्या आंदोलकांना समजावून सांगायला आल्या होत्या. पण, त्या थेट पीडितांना धमकावू लागल्या होत्या. त्यांचा आंदोलकांबरोबर वाद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक एसडीएमवर ट्विटरवरून नाराजी व्यक्त करत आहेत.
आंदोलक आणि एसडीएम यांच्यात असा घडला संवाद-
आंदोलक महिला- तुम्ही वाईट पद्धतीने वागला आहात, मॅडम, तुम्ही वाईट वागला आहात. तुम्हाला हात जोडून सांगितले, तिघांनाही आत टाका.
एसडीएम- तुम्हाला काही समजत नाही.
आंदोलक महिला- काय समजायचे, काय समजायचे ते सांगा, समजावून सांगा मॅडम