नवी दिल्ली : एमसीडी ( दिल्ली महानगरपालिका ) सभागृहात शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. नगरसेवकांनी केलेल्या कृत्यामुळे सभागृहाच्या पंपरेला तडा गेला. महिला नगरसेवक एकमेकांचे केस ओढत असताना पुरुष नगरसेवक एकामेकांना चपलां मारुन फेकत होते. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपचे नगरसेवक फेरमतमोजणीची मागणी करत असताना अचानक काही नगरसेवक महापौरांच्या दिशेने पुढे आहे. तेथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी महापौरांच्या खुर्चीजवळ जात महापौरांची खुर्ची उचलून फेकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
एक नगरसेवक बेशुद्ध :या धक्काबुक्कीनंतर महापौरांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी सभामंडपातून बाहेर पडले. एक मत अवैध ठरवून महापौर निकाल जाहीर करणार होते, असे बोलले जात होते, मात्र, मतांची मोजणी व्यवस्थित झालीच पाहिजे, यावर भाजप नगरसेवक ठाम होते. या हाणामारीत एक नगरसेवक बेशुद्ध पडला. भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य पदाचे उमेदवार कमलजीत सेहरावत यांनी स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत फेरमतमोजणी न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.