इंदूर :मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उशा ठाकूर यांनी रविवारी गोमातेचे कौतुक करण्याचा आणखी एक टप्पा पार केला. कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी घरामध्ये शेणाच्या गोवऱ्यांचा यज्ञ करण्याचा सल्ला त्यांनी दिला. असे केल्यास घर १२ तासांपर्यंत निर्जंतुक राहते असा दावा त्यांनी यावेळी केला. इंदूर पत्रकारसंघातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईमध्ये अॅलोपॅथीसोबतच वेदिक संस्कृतीचाही मोठा वाटा आहे. ही महामारी म्हणजे आपल्याला वेदिक संस्कृतीकडे परतण्याचा इशारा असल्याचेही ठाकूर यावेळी म्हणाल्या.