प्रयागराज (उत्तरप्रदेश) -अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर आज (दि. 22 सप्टेंबर) अंत्यविधी करण्यात येणार आहे. यामुळे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. याबाबत आदेश मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) संतांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्ह्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. 22) अंत्यविधी करण्यात येणार आहे. यामुळे शहरात त्यांचे भक्त महंत गिरी यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतील. यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी आर. एन. विश्वकर्मा यांनी दिले आहेत.
मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अखाडा परिषदचे महंत हरि गिरी यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. 23) अंत्यविधी करण्यात येईल, असे घोषित केले होते. पण, त्यापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी बुधवारी शवविच्छेदनानंतर मंठ बाघम्बरी येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती..
महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज जिल्ह्यात संशयास्पद स्थितीत सोमवारी (दि. 20 सप्टेंबर) मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येला शिष्य आनंद गिरी, आघा तिवारी आणि अनय एकास जबाबदार धरले आहे. तसेच, मागील आठवड्यातसुद्धा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मरणानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याची देखील नोंद सुसाईड नोटमध्ये केली आहे.
सीबीआय चौकशीची मागणी-
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांच्य मृत्यू प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील सुनील चौधरी यांनी दाखल केली आहे. नरेंद्र गिरी कधीही आत्महत्या करणार नाहीत, असे विविध संतांचे म्हणणे आहे. महंत यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही जणांचा वारस म्हणून उल्लेख केला आहे. चिठ्ठीत नाव लिहिलेले आनंद गिरी, हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे माजी खासदार विनय कटियार यांनी महंत नरेंद्र यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष चौकशी करणे हा एकमेव मार्ग असल्याचे माजी खासदार कटियार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण; सुसाईड नोट हाती लागली, त्यात लिहिलंय...