पलामू :पांकी येथे झालेल्या हिंसाचाराने देशभर खळबळ उडाली आहे. या हिंसाचारात 150 शालेय विद्यार्थी अनेक तास अडकल्याने चांगलीच खळबळ उडाली. या शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या निगराणीत घरी पोहोचवण्यात आले. पोलिसांच्या निगराणीत या शालेय विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. हे सगळे विद्यार्थी पलामू आणि त्याच्या आसपासच्या गावातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन गटातील कार्यकर्ते बुधवारी आपसात भिडल्याने पलामूत हिंसाचार उफाळून आला होता.
शाळेत सुरू होती प्रार्थना अन् बाहेर हिंसाचार :पलामू परिसरात बुधवारी दोन गट आपसात भिडल्याने चांगलाच हिंसाचार उफाळून आला. यावेळी ब्राईट फ्युचर स्कूल आणि शिक्षा निकेतन या दोन्ही शाळेत प्रार्थना सुरू होती. त्यामुळे शाळेतील मुले एकाच जागेवर स्तब्ध उभे होते. त्यामुळे त्यांना तात्काळ बाहेर पडता आले नाही. शाळेच्या प्राचार्यांनी तात्काळ शाळेचे दरवाजे बंद केल्यामुळे मुले शाळेच सुरक्षित होते. त्यातही जे जवळचे पालक होते, त्यांनी आपल्या पाल्यांना घेऊन घर जवळ केले. मात्र जे विद्यार्थी इतर लांबच्या गावातून आले होते, ते मात्र शाळेतच अडकून पडले.
हिंसाचारामुळे घाबरले विद्यार्थी :पलामू हिंसाचारामुळे ब्राइट फ्यूचर स्कूल आणि शिक्षा निकेतन या दोन्ही शाळेतील 150 शालेय विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. त्यामुळे या शाळेच्या प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांना शाळेतील एका खोलीत बंद केले होते. ब्राईट फ्युचर शाळेचे संचालक मोहम्मतौफिक अंसारी यांनी हे सगळे विद्यार्थी प्रचंड घाबरल्याची माहिती दिली. या विद्यार्थ्यांना एका खोलीत ठेवल्याने त्यांना धिर देत खाण्याच्या वस्तू देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.