नवी दिल्ली: Gyanvapi Masjid: वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलात सापडलेल्या 'शिवलिंगा'च्या संरक्षणाशी protection of shivling संबंधित याचिकेवर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या निवेदनाची दखल घेत गुरुवारी सांगितले की, या प्रकरणातील संरक्षण आदेशाची मुदत १२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. उद्या (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता आम्ही खंडपीठ स्थापन करू, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने 17 मे रोजी अंतरिम आदेश देत वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्यांना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाच्या आत जेथे कथित 'शिवलिंग' सापडले त्या परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते आणि मुस्लिमांना प्रार्थना करण्यास परवानगी दिली होती.