नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालायाने १२ वीच्या सीबीएसई व आयसीएसईच्या परीक्षांच्या मुल्यांकनावर आक्षेप घेणारी याचिका फेटाळली आहे. दोन्ही बोर्डाच्या निर्णयाला विद्यार्थी पाठिंबा देत आहेत. अशा स्थितीत बोर्डाचे निर्णय योग्य आणि सयुक्तिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
सीबीएसई व आयसीएसईने १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता मुल्यांकनाचे फॉर्म्युले निश्चित केले आहेत. या फॉर्म्युल्यांना आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. हे सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळले. फॉर्म्युला निश्चित करताना १३ तज्ज्ञांच्या समितीने सर्व मुद्दे विचारात घेतल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.
हेही वाचा-महिला लेफ्टनंटचा मृतदेह झाडावर आढळला लटकलेल्या अवस्थेत...खुनाचा पतीवर आरोप