महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CBSE CISCE EXAMS सीबीएसईसह सीआयएससीई परीक्षा हायब्रीड पद्धतीने घेण्यास 'सर्वोच्च' नकार - महाधिवक्ता तुषार मेहता

सर्वोच्च उच्च न्यायालयाने म्हटले, की केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाची (सीबीएसई) पहिली सत्र परीक्षा 16 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. तर काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या (CISCE) बोर्डाच्या पहिल्या सत्राची परीक्षा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

By

Published : Nov 18, 2021, 4:04 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि सीआयएससीईच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय (high court on CBSE and CISCE exams) दिला आहे. उच्च न्यायालयाने 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षार्थींना ऑफलाईन माध्यमातून परीक्षेला बसण्याऐवजी हायब्रीड पद्धतीने (hybrid mode option) (म्हणजे ऑफलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देण्यास नकार दिला आहे. या पातळीवर प्रक्रियेमध्ये अडथळा आणणे योग्य नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाची (सीबीएसई) पहिली सत्र परीक्षा 16 नोव्हेंबरला (CBSE Exams date) सुरू होणार आहे. तर काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या (CISCE exams date) बोर्डाच्या पहिल्या सत्राची परीक्षा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा-'सीबीएसई ऑनलाईन परिक्षांसाठी सज्ज नाही, तयारीला आणखी काही वर्ष लागतील'

सीबीएसईच्यावतीने महाधिवक्ता तुषार मेहता (Tushar Mehata on CBSE Exam in court) यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. त्यांनी न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश सी. टी. रविकुमार यांनी खंडपीठाला सांगितले, की ऑफलाईन माध्यमातून बोर्डाच्या परीक्षेत सर्व काळजी घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांची संख्या 6,500 वरून 15,000 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा-कुठे आनंद तर कुठे दु:ख; सीबीएसई परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी नाराज

खंडपीठाने म्हटले, की प्रशासकीय अधिकारी परीक्षेदरम्यान सर्व उपाययोजना घेतील अशी आशा आणि विश्वास आहे. परीक्षेत कोणतीही अप्रिय घटना घडू नये, अशी उपाययोजना करण्यात याव्यात. दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली आहे. कोरोनाच्या काळात सीबीएसई आणि सीआयएससीईच्या परीक्षा फक्त ऑफलाईन माध्यमातून न घेता हायब्रीड माध्यमातून घ्याव्यात, अशी या विद्यार्थ्यांनी याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

हेही वाचा-CBSE EXAMS : सीबीएसईने जारी केल्या नमुना ओएमआर शीट

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास सीबीएसई बोर्डची तयारी नाही-

कोरोनामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील शाळा महाविद्यालये बंद झाली होती. लॉकडाऊनने सर्वांना व्हर्च्युअल म्हणजेच ऑनलाईन शिक्षणाकडे वळण्यास भाग पाडले आहे. मात्र, भारत अजूनही या स्वप्नापासून दुर असल्याचे दिसून आले होते. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास सीबीएसई बोर्ड तयार नसल्याचे बोर्डाचे माजी अध्यक्ष अशोक गुलेरिया यांनी म्हटले होते.

संबंधित बातमी वाचा-'सीबीएसई ऑनलाईन परिक्षांसाठी सज्ज नाही, तयारीला आणखी काही वर्ष लागतील'

ABOUT THE AUTHOR

...view details